- Advertisement -
PunekarVoice.com
PCMC ब्रेकिंग

पिंपरी-चिंचवड महापालिकेत खळबळ! मुख्य अभियंता प्रमोद ओंबोसे एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबोसे यांना १९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड : PCMC महापालिकेत लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबोसे यांना १९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. संबंधित कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून कारवाईबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

Tags:

प्रतिक्रिया (0)

आपली प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया मॉडरेशननंतर प्रकाशित होईल.

अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. पहिली प्रतिक्रिया द्या!